Monday, October 25, 2010

डेरवण येथील राजेशिर्के यांचा राजवाडा

           डेरवण या गावी सद्यस्थितीतील शिवशिल्पसृष्टी शिव समर्थ गडापासून सुमारे 1.5 किमी. अंतरावर हा राजवाडा इतिहासप्रेमी पर्यटकांचे स्वागतास उभा आहे. येथे आजही राजेशिर्के यांचे वंशज नांदत आहेत. श्रीमंत ईनामदार बाबासाहेब राजेशिर्के यांनी सुमारे 1840 ते 50 च्या सुमारास या दुमजली राजवाडयाची उभारणी केली.
                सद्यस्थितीत सुमारे 7 हजार चौरस फुट इतक्या भूक्षेत्रावर निवासी वास्तू उभी आहे. राजवाडयाच्या पायाच्या जोत्यांमध्ये शिशाचा रस ओतून तद्नंतर पुढील बांधकाम केले गेले. पायाच्या बांधकामात काळया प्ााषाणाच्या अखंड तोडी वापरल्या आहेत. तर भिंत बांधकामात दगड, विटा, गूळ, चुनखडी व अंडयाचा बलक यांचे मिश्रण वापरले आहे. राजवाडयाच्या छतावर पूर्वी नळयाची कौले होती. सद्यस्थितीत साधे कौलारू छप्पर आहे. तसेच या चौसोपी राजवाडा बांधकामात फणस व सागवाणी लाकडाचा वापर केला आहे. राजवाडयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमूख असून प्रवेश करताच सदर सभागृह लागते. सदरे लगतच माजघर असून त्यास जोडून बाळंतिणीची खोली आहे. पश्चिमेस तुळशी वृंदावनाची व विहीरीची रचना राजस्त्रियांसाठी केली आहे. राजवाडयासमोरील विहीरीचा वापर पुरूषमंडळींना करण्याचे प्रयोजन होते. सदरेच्या वरच्या मजल्यावर जुळा दिवाणखाना व अंतर्गत बाजूस शयनकक्ष आहे. दिवाणखान्यासमोर दर्शनी भागात लांबलचक सज्जा (गॅलरी) आहे.
             राजवाडयात पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृती त्यांच्या वापरातील काही ऐतिहासिक वस्तू कायम जोपासून ठेवल्या आहेत. महापराक्रमी राजघराण्यातील राजवाडयातील वंशज पर्यटकांसमोर आदरतिथ्याने ऐतिहासिक गाथा उलगडतात. शिर्केवाडयापासून सुमारे 2 किमी. अंतरावर राजेशिर्केवाडी येथे निसर्गरम्य वातावरणात धरण आहे. मुंबई गोवा महामार्गावर डेरवण फाटा येथून 4किमी. अंतरावर तर शिवसमर्थगडापासून डेरवणचा राजवाडा सुमारे 1.5 किमी अंतरावर आहे.   

6 comments:

  1. superb..........!!!!!!
    mind blowing!!!!

    ReplyDelete
  2. mast kadak blog ahe......pratek kokan vasini ha blog nakkich vachla pahije...ajun khi lihat ja...

    ReplyDelete
  3. i am like it.ajun kahi lihat ja...

    ReplyDelete
  4. राजेशिर्के ..! आपण ही जी माहिती छापली आहे ..ती अगदी विश्वसनीयच आहे .. कारण या ठिकाणी आम्ही जाऊन आलोय .. आणि हे ठिकाण आमच्या चिपळूण मध्ये आहे .. डेरवण येथील " शिवसृष्टी " पाहिल्यानंतर आवर्जून पहावे असेच ऐतिहासिक ठिकाण आहे हे ..!!

    ReplyDelete
  5. Shradha tu sankalit keleli mahiti yogya ahe pan sadhya rajeshirke gharane kutare, kudap, kondamala, adare, talasar ya panchakroshit vasaleli ahet
    yacha ullekh kar

    ReplyDelete
  6. http://udayshirke.blogspot.com/
    saglya rajeshirkyanbarobar ya rajeshirkecha hi ullekh jarur karava...............

    ReplyDelete