प्राचीन देवालय !!!!

           प्राचीन देवालयाची वास्तू यादव कालीन देवळांच्या धर्तीवरच असावी. असे मानतात की, सातवाहनांच्या काळापासुन महाराष्ट्रात देवीच्या पूजेचे महात्म्य वाढलेले होते.
       देवळांच्या समोर तट होता. दक्षिण आणि उत्तर दिशांना दरवाजे होते.समोर भव्य दिपमाळा होती. यावनांनी या भव्य देवळाचा विध्वंस केल्यावर छ. शाहू महाराजाच्यां काळात सातारच्या राणीसाहेबानी आपल्या माहेरच्या कुलस्वामीनीचे लहानसेच पण देखणे देवालय बांघले होते. पानशेत धरणात प्राचीन देवालयाच्या सर्व खाणा खुणा नष्ट झाल्या पण सातारच्या महाराणीने बांधलेले देवालय पाण्यात अजून उभे आहे. जत्रेच्या काळात तेथे पाणी नसते. या देवळाचे शिखर मावळातील देवळाच्या शिखरामध्ये अत्यंत सुंदर आणि आकर्षक शिखर मानले जात होते. ते अतिशय कलात्मक होते.
         कोटाच्या आत कुलस्वामीनी श्रीशिर्काई, श्रीमानाई (श्री सरस्वती) आणि श्री वाघाजाई (श्री महालक्ष्मी) अशी एकून तीन देवळे होती.
शिर्काई देवळाला लागून बरीच देवळे असावीत, त्यातील एका प्रचंड शिवमंदिराचे अवशेष अजूनही तेथे पहावयांस मिळतात. नंदी आणि शिवलिंगे या स्वरूपात हे अवषेश तेथे विखुरलेले आहेत.