Monday, October 25, 2010

डेरवण येथील राजेशिर्के यांचा राजवाडा

           डेरवण या गावी सद्यस्थितीतील शिवशिल्पसृष्टी शिव समर्थ गडापासून सुमारे 1.5 किमी. अंतरावर हा राजवाडा इतिहासप्रेमी पर्यटकांचे स्वागतास उभा आहे. येथे आजही राजेशिर्के यांचे वंशज नांदत आहेत. श्रीमंत ईनामदार बाबासाहेब राजेशिर्के यांनी सुमारे 1840 ते 50 च्या सुमारास या दुमजली राजवाडयाची उभारणी केली.
                सद्यस्थितीत सुमारे 7 हजार चौरस फुट इतक्या भूक्षेत्रावर निवासी वास्तू उभी आहे. राजवाडयाच्या पायाच्या जोत्यांमध्ये शिशाचा रस ओतून तद्नंतर पुढील बांधकाम केले गेले. पायाच्या बांधकामात काळया प्ााषाणाच्या अखंड तोडी वापरल्या आहेत. तर भिंत बांधकामात दगड, विटा, गूळ, चुनखडी व अंडयाचा बलक यांचे मिश्रण वापरले आहे. राजवाडयाच्या छतावर पूर्वी नळयाची कौले होती. सद्यस्थितीत साधे कौलारू छप्पर आहे. तसेच या चौसोपी राजवाडा बांधकामात फणस व सागवाणी लाकडाचा वापर केला आहे. राजवाडयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमूख असून प्रवेश करताच सदर सभागृह लागते. सदरे लगतच माजघर असून त्यास जोडून बाळंतिणीची खोली आहे. पश्चिमेस तुळशी वृंदावनाची व विहीरीची रचना राजस्त्रियांसाठी केली आहे. राजवाडयासमोरील विहीरीचा वापर पुरूषमंडळींना करण्याचे प्रयोजन होते. सदरेच्या वरच्या मजल्यावर जुळा दिवाणखाना व अंतर्गत बाजूस शयनकक्ष आहे. दिवाणखान्यासमोर दर्शनी भागात लांबलचक सज्जा (गॅलरी) आहे.
             राजवाडयात पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृती त्यांच्या वापरातील काही ऐतिहासिक वस्तू कायम जोपासून ठेवल्या आहेत. महापराक्रमी राजघराण्यातील राजवाडयातील वंशज पर्यटकांसमोर आदरतिथ्याने ऐतिहासिक गाथा उलगडतात. शिर्केवाडयापासून सुमारे 2 किमी. अंतरावर राजेशिर्केवाडी येथे निसर्गरम्य वातावरणात धरण आहे. मुंबई गोवा महामार्गावर डेरवण फाटा येथून 4किमी. अंतरावर तर शिवसमर्थगडापासून डेरवणचा राजवाडा सुमारे 1.5 किमी अंतरावर आहे.   

राजेशिर्के राजघराणे प्रथम ........ कोकणातील कुटरे या गावी आले.

कुटरे येथील राजेशिर्के यांचा थोरला वाडा -
          राजेशिर्के घराण्याने कुटरे येथे प्रथम राजवाडा बांधला. त्यानंतर ते स्वतंत्र झाले. त्यांचा मूळवाडा हाच असल्याने यास थोरला वाडा असे म्हणतात. सध्याच्या चिपळूण तालुक्यातील शिवपूर्ण काळात कोकणातील  कुटरे या गावी राजेशिर्के राजघराणे प्रथम आले. गावातील खालची पेठमधील गणेशवाडीत आजही या घराण्याची शौर्यसाक्ष मूकपणे देत आहे.
            हा चौपाखी जुना वाडा काका राजे यांचा होता. या पुरातन वाडयात सद्यस्थितीत राजेशिर्के यांचे वंशज नांदत आहेत. येथे नवसाला पावणा-या श्री देवी सुकाई देवीची पूजाअर्चा दैनंदिन होते. या राजवाडयाचे भग्नावशेष आजही शौर्यगाथा सांगण्यास तग धरून आहेत. येथे राजेशिर्के घराण्यांच्या पूर्वजांच्या पराक्रम गाजविणा-या काही साक्षीदार वस्तू वंशजांच्या संग्रही आहेत.

Saturday, October 23, 2010

श्री शिरकाईचा उत्सव सोहळा.......!!!

उत्सव परंपरा......!!!!!!!
          कोकणात राज्य करीत असताना सिंधुदुर्ग जिल्हयातीत देवगड तालुक्यातील "श्रीकुण्केस्वर" या सुमारे 2 हजार वर्षासन देत होते. असा इतिहासात उल्लेख आढळतो. भैखगडावरही श्री शिर्काईचे देवालय आहे.
        येथे "नवरात्रात" आणि "चैत्रात" असे दोन उत्सव होतात. चैत्रातील यात्रेस संपूर्ण भारतातून श्री शिर्काईचे भक्त एकत्र होतात. शिर्के यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक मराठा घराण्यामध्ये कुलदेवता म्हणून श्री शिर्काईची उपासना सुरू आहे. सर्वजाती पोटजाती आणी अन्य धर्मियांची तेथे गर्दी दिसून येते.
        जत्रेच्या वेळी भक्तग़ण नवस फेड्तात बलीप्रथा मात्र बंद  आहे. अधुन  मधून देवीच्या नावे रेडा सोडण्यात  येतो.
      सूर्यास्ताच्या सुमारास वाजत गाजत श्री शिर्काईची पालखी निघते व शिवाजी महाराजांच्या काळातीत थोर ऐतिहासक घराणे -पासलकर यांचे वंशज शिरकोलीत आहेत त्यांच्याकडे 'पालखी' जाते. हा मान या घराण्यात पूर्वापार चालत आलेला आहे.
        चैत्र कृष्ण प्रतिपदेस म्हणजेच दि.12 अ‍ॅप्रील 98 रोजी, रविवारी शिरकोली येथे श्री शिर्काईदेवीची भव्य जत्रा भरत आहे, श्री शिर्काईदेवी ही मावळ खोऱ्यातील जागृत देवता आहे.
          श्री शिर्काईच्चा देवालयास जितके घार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे तितकेच ऐतिहासिक महत्वही लाभलेले आहे, महाराष्ट्रात क्षत्रियांचा प्रवेश असताना वसाहतीसाठी स्थानिक घनगर आणि कोळी भूमीवर्चस्वासाठी जो तीव्र संघर्ष झालेला आहे त्याची एक सुंदर अर्थपूर्ण लोककथा श्री शिर्काईच्चा देवळाभोवती गुंफली गेली आहे, या लोककथेतून महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासाची  साक्ष मिळ्ते. या इतिहासातून  किती तरी प्राचीन कोडी या लोक कथेत सापडतात, अशा या प्राचीन श्री शिर्काई देवी साठी यवनी आक्रमणकाळात जी जीवघेणी झुंज ध्यावी लागली, त्या रक्तरंजित प्रसंगाच्चा शर्थीच्चा पराक्रमाची, अतुलनीय शौर्याची आणि असामान्य बलिदांनाची ग्वाही देणारे वीरवळ सतीशिला अजूनही शिरकोलीत सापडतात, अशी ही देवता श्री शिर्काईदेवी!!!!

श्री छत्रपती शिवाजीराजेंसाठी जिजाऊ माउली शिरकाईस नवस बोलल्या होत्या....!!!!!

राजमाता जिजाबाई दर्शनास आल्या होत्या .........!!!!
        शिवकाळात श्री शिर्काईचा  चार घाटातील, रामवरदानी, कोल्हापूरची अंबाई आणी, कोढणपुरची तुकाई बरोबर उल्लेख होत असे. गर्भवती असताना राजमाता जिजाबाई येथे नवस करावयास आल्या होत्या आणि आपल्या पोटी पराक्रमी पुत्र जन्मास यावा म्हणून त्यानी श्रीशिर्काईची प्रार्थना केली होती. शिल्पाच्या  दृष्टीने श्रीशिर्काईची प्रतीमा देखणी आहे. त्यामानाने इतर प्रतीमा कलात्मकदृष्टया साधारण भासतात.  

Friday, October 22, 2010

शिरकोली - श्री शिरकाई कुलस्वामिनीचे स्थान!!!!!!!!!

भौगोलिक स्थान :
        
    सध्याच्या  पुणे जिल्यातील वेल्हे तालुक्यांत शिरकोली नावाचे एक लहानसे खेडे आहे. हा सह्याद्रीच्या शिख्ररांचा प्रदेश. त्यामुळे या शिर्कुलीचे अस्सल नांव 'शिरकावली' आहे. पण कालांतराने बदल होउन ते शिरकोली झाले. आंबेगांव नदीच्या  खोरयातील हे गांव पूर्वी शिरकोलीच्चा ओढ्याच्या काठावर होते. पांनशेतला वीर जानाजी धरण झाले आणि या संपूर्ण भागाचा भूगोल बदलला.
       मंदिराच्या परिसरात पश्चिमेचा घामणटेप, उत्तरेचा विलालपूर नाईकिणीचां महाल, आंबेगांव नदी, शिरकाई खिंड इ. सारे भूमिअवशेष आपल्या परिचयासह पानशेताच्या पाण्यात आता विसर्जित झालेले आहे.
      पूणे ते पानशेत आणि पानशेत ते शिरकोली असा उन्हाळी रस्ता झाल्यामुळे पुण्यापासून वाहनांनी थेट जाता येते. पावसाळ्यात हा रस्ता बंद होतो आणि पानशेत तलावाच्या काठाकाठाने पायी प्रवास करुन 16 - 17 मैलावरील शिरकोलीस जाता येते.
दूध वाहतूक करणारया लाँचेसमधूनही प्रवासी वाहतूक होत असते. पण पक्या रस्ताच्या अभावी वर्षाचा बराच काळ या भागातील जनतेला जे हाल सोसावे लागतात ते भयंकर आहेत,असे दुदैवाने आपल्या युगात म्हणावे लागत आहे.

"न भूतो न भविष्यती".........अशी ही एक लढाई

गनिमी कावा आणि मुसलमानांचा पराभाव........
          चालुक्याचे साम्राज्य नष्ट झाल्यावर शिर्के घराण्याने एकाच वेळी घाट आणि कोकणावर राज्य केले, रायगड, विशालगड, पन्हाळा, वासोटा, भैखगड, रागणा ई. प्रसिद्ध किल्ले या घराण्याच्या ताब्यात होते. या धराण्याने सागरावरही प्रभुत्व स्थापन केलेल होते. त्यासाठी शिर्क्यानी अंदाजे 300 गलबते असलेले सामर्थ्यशाली आरमार उभे केले होते.
          इ.स. 1463 मध्ये अंदाजे 11 हजार सैन्य घेउन हामनी सुलतानाच्या मालीक उत्तजरा या क्रूर सेनापतीने शिर्के  घराण्यावर स्वारी केली. विशाळगडाच्या पायथ्याशी घनघोर युद्ध झाले. गनिमी काव्याचा चातूर्याने उपयोग करुन शिर्क्यानी 11 हजार मूसलमान सैन्यांची कत्तल केली. न भूतो न भविष्यती अशी ही लढाई झाली त्यां नंतर तब्बल 16 वर्ष मूसलमानांनी कोकणात उतरण्याची हिम्मत केली नाही. उलट " सर्वत्र अल्लाहचे राज्य आहे. शिवरायाच्चा मुलखात मांत्र सैतान राहतो" असे म्हणतात.
           या युद्धात शिर्के घराण्यातील वीरांनी जे आत्मबलिदान केले त्यांची साक्ष शिरकोलीत आहे. रायगड किल्ला हातातून गेल्यावर श्री शिर्काईचे देवालय घनदाट जंगलात नेले असण्याची शक्यता नकारता येत नाही.
        आजही देवळात श्री शिर्काईच्या मूर्तीची पूजा होत आहे. ती मुर्ती खंडीत आहे परंतु एका कुशल सोनाराने भंगलेली मूर्ती सांधून दिलेली आहे तांब्याच्या पट्ट्या अजूनही द्रष्टीमान होतात, मूर्तिभंजकानी मूर्ती वरही प्रहार केलेले आहे, हा इतिहास मूर्तीचे दर्शन होताच आठवल्याशिवाय रहात नही, ही घटना महम्मद गझनीच्या स्वारीच्या वेळी घडलेली असावी.  

राजेशिर्के शब्दाची व्युत्पत्ती......!!!!!!!!!

        
            इ. स. च्या ५/६  व्या  शतकांत कोकण प्रांतीय   चालूक्य    घराण्यातील पराक्रमी राजा पुलकेशी  द्वितीय   विक्रमादित्याच्या  काळात राजेशिर्के  हे एतिहासीक घराणे उदयास आले.
       त्या काळी श्री सेहद्रके (सहर्णेद्रक) या नावाने हे घराणे प्रसिद्ध होते. कालांतराने मधली अक्षरे गहाळ होउन या घराण्याचे नाव 'श्रीके' असे पडले. मुसलमानी आमदानीत 'श्रीके' चा अपभ्रंश  'शिर्के' असा पुढे प्रचलित झाला अन तो आजतागायत तसाच रूढ आहे.
         विक्रमादित्याचा कालखंडात पराक्रमी मामा सेनानंद राजेशिर्के यांच्या  कारकिर्दीत चिपळुणात संपन्न झालेल्या  एका शिलालेखात सदर  उल्लेख सापडतो.

श्री शिर्काई - भवानी!!!!!!!!!!!!!!

          राजेशिर्के हे तोमर वंशिय क्षत्रिय घराणे आहे. 'तोमर' हे माल्यासारख्या एका प्राचीन शस्त्राचे नाव असुन 'महाभारत' युद्वात 'तोमर' नावाचे शस्त्र वापरले गेले होते.
     शिर्के घराणे अष्टभूजा भवानीचे उपासक आहे ही भवानीदेवी राजेशिर्के यांची कुलदेवता असल्यामुळे तिचेच शिर्काईदेवी असे नाव सर्वज्ञात आहे.
         मुसलमानांचा कोकणांत प्रवेश होई पर्यंत रायगडावर राजेशिर्के यांनी राजधानी ठेवलेली होती. अजूनही रायगडावर प्रमुख देवता म्हणून श्री शिर्काई  देवीस मान आहे. 

Thursday, October 21, 2010

आयुष्य

"आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकायची सवयच आहे,
हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत...."