Saturday, October 23, 2010

श्री शिरकाईचा उत्सव सोहळा.......!!!

उत्सव परंपरा......!!!!!!!
          कोकणात राज्य करीत असताना सिंधुदुर्ग जिल्हयातीत देवगड तालुक्यातील "श्रीकुण्केस्वर" या सुमारे 2 हजार वर्षासन देत होते. असा इतिहासात उल्लेख आढळतो. भैखगडावरही श्री शिर्काईचे देवालय आहे.
        येथे "नवरात्रात" आणि "चैत्रात" असे दोन उत्सव होतात. चैत्रातील यात्रेस संपूर्ण भारतातून श्री शिर्काईचे भक्त एकत्र होतात. शिर्के यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक मराठा घराण्यामध्ये कुलदेवता म्हणून श्री शिर्काईची उपासना सुरू आहे. सर्वजाती पोटजाती आणी अन्य धर्मियांची तेथे गर्दी दिसून येते.
        जत्रेच्या वेळी भक्तग़ण नवस फेड्तात बलीप्रथा मात्र बंद  आहे. अधुन  मधून देवीच्या नावे रेडा सोडण्यात  येतो.
      सूर्यास्ताच्या सुमारास वाजत गाजत श्री शिर्काईची पालखी निघते व शिवाजी महाराजांच्या काळातीत थोर ऐतिहासक घराणे -पासलकर यांचे वंशज शिरकोलीत आहेत त्यांच्याकडे 'पालखी' जाते. हा मान या घराण्यात पूर्वापार चालत आलेला आहे.
        चैत्र कृष्ण प्रतिपदेस म्हणजेच दि.12 अ‍ॅप्रील 98 रोजी, रविवारी शिरकोली येथे श्री शिर्काईदेवीची भव्य जत्रा भरत आहे, श्री शिर्काईदेवी ही मावळ खोऱ्यातील जागृत देवता आहे.
          श्री शिर्काईच्चा देवालयास जितके घार्मिक महत्व प्राप्त झालेले आहे तितकेच ऐतिहासिक महत्वही लाभलेले आहे, महाराष्ट्रात क्षत्रियांचा प्रवेश असताना वसाहतीसाठी स्थानिक घनगर आणि कोळी भूमीवर्चस्वासाठी जो तीव्र संघर्ष झालेला आहे त्याची एक सुंदर अर्थपूर्ण लोककथा श्री शिर्काईच्चा देवळाभोवती गुंफली गेली आहे, या लोककथेतून महाराष्ट्राचा प्राचीन इतिहासाची  साक्ष मिळ्ते. या इतिहासातून  किती तरी प्राचीन कोडी या लोक कथेत सापडतात, अशा या प्राचीन श्री शिर्काई देवी साठी यवनी आक्रमणकाळात जी जीवघेणी झुंज ध्यावी लागली, त्या रक्तरंजित प्रसंगाच्चा शर्थीच्चा पराक्रमाची, अतुलनीय शौर्याची आणि असामान्य बलिदांनाची ग्वाही देणारे वीरवळ सतीशिला अजूनही शिरकोलीत सापडतात, अशी ही देवता श्री शिर्काईदेवी!!!!

4 comments:

  1. "कोकणात राज्य करीत असताना सिंधुदुर्ग जिल्हयातीत देवगड तालुक्यातील "श्रीकुण्केस्वर" या सुमारे 2 हजार वर्षासन देत होते. असा इतिहासात उल्लेख आढळतो." ............ सदर विधानाचा अर्थ उमगत नाही.
    त्याचप्रमाणे या लेखामध्ये जी महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी लोककथा असा उल्लेख केला आहे ती लोककथा आपणास ज्ञात असल्यास जरूर कळवा...... कारण इथे मी हा ब्लॉग जास्तीत जास्त सत्य व अर्थपूर्ण माहिती गोळा करून राजेशिर्के इतिहास जाणून घेण्याचा व सदर माहिती आमच्यासारख्या अशा बहुमूल्य माहितीपासून अजाण असलेल्यांना माहित करून देणे हेच खास प्रयोजन या ब्लॉगच्या आयोजनामागचे आहे.

    ReplyDelete
  2. आपण भेट देणाऱ्यापैकी जर कुणी याबाबत अधिक माहिती जाणत असाल तर कृपया त्याचे स्पष्टीकरण द्यावे हि विनंती...!!
    तसेच सदरहू उतारा हा http://shirkaibaroda.org/history.asp इथून घेतला आहे. तेव्हा त्याकालावाधीतील माहिती म्हणजेच ...""दि.12 अ‍ॅप्रील 98 रोजी, रविवारी शिरकोली येथे श्री शिर्काईदेवीची भव्य जत्रा भरत आहे"" असा जो उल्लेख आढळतो तो तसाच इथे लिहिण्यात आलेला आहे.
    तरी यंदाची जत्रा मंगळवार दिनांक ३० मार्च,२०१० रोजी संपन्न झाली. आणि तसे साधारणपणे दोन ते अडीच महिने अगोदरच छापील पुस्तकातून सभासद सदस्यांना कळविण्यात येते.

    ReplyDelete
  3. नमस्कार!
    ब्लॉग अत्यंत सुंदर आहे एकच विनन्ति आहे !
    "फ़ॉन्ट कलर " चेंज करवा अशी कारण वाचताना " तान पड़त आहे!"

    ReplyDelete