Friday, October 22, 2010

श्री शिर्काई - भवानी!!!!!!!!!!!!!!

          राजेशिर्के हे तोमर वंशिय क्षत्रिय घराणे आहे. 'तोमर' हे माल्यासारख्या एका प्राचीन शस्त्राचे नाव असुन 'महाभारत' युद्वात 'तोमर' नावाचे शस्त्र वापरले गेले होते.
     शिर्के घराणे अष्टभूजा भवानीचे उपासक आहे ही भवानीदेवी राजेशिर्के यांची कुलदेवता असल्यामुळे तिचेच शिर्काईदेवी असे नाव सर्वज्ञात आहे.
         मुसलमानांचा कोकणांत प्रवेश होई पर्यंत रायगडावर राजेशिर्के यांनी राजधानी ठेवलेली होती. अजूनही रायगडावर प्रमुख देवता म्हणून श्री शिर्काई  देवीस मान आहे. 

1 comment:

  1. खूप रंजक माहिती पुरविलीत राजे ... जय शिरकाई आई ...!! जय भवानी ...!!

    ReplyDelete