भौगोलिक स्थान :
सध्याच्या पुणे जिल्यातील वेल्हे तालुक्यांत शिरकोली नावाचे एक लहानसे खेडे आहे. हा सह्याद्रीच्या शिख्ररांचा प्रदेश. त्यामुळे या शिर्कुलीचे अस्सल नांव 'शिरकावली' आहे. पण कालांतराने बदल होउन ते शिरकोली झाले. आंबेगांव नदीच्या खोरयातील हे गांव पूर्वी शिरकोलीच्चा ओढ्याच्या काठावर होते. पांनशेतला वीर जानाजी धरण झाले आणि या संपूर्ण भागाचा भूगोल बदलला.
मंदिराच्या परिसरात पश्चिमेचा घामणटेप, उत्तरेचा विलालपूर नाईकिणीचां महाल, आंबेगांव नदी, शिरकाई खिंड इ. सारे भूमिअवशेष आपल्या परिचयासह पानशेताच्या पाण्यात आता विसर्जित झालेले आहे.
पूणे ते पानशेत आणि पानशेत ते शिरकोली असा उन्हाळी रस्ता झाल्यामुळे पुण्यापासून वाहनांनी थेट जाता येते. पावसाळ्यात हा रस्ता बंद होतो आणि पानशेत तलावाच्या काठाकाठाने पायी प्रवास करुन 16 - 17 मैलावरील शिरकोलीस जाता येते. दूध वाहतूक करणारया लाँचेसमधूनही प्रवासी वाहतूक होत असते. पण पक्या रस्ताच्या अभावी वर्षाचा बराच काळ या भागातील जनतेला जे हाल सोसावे लागतात ते भयंकर आहेत,असे दुदैवाने आपल्या युगात म्हणावे लागत आहे.

सध्या शिरकोलीला पोहोचण्यासाठी खूप सोयी-सुविधा झालेल्या आहेत. देवीच्या यात्रेच्या निमित्ताने शेकडोंच्या संख्येने येथे खाजगी वाहने आरामात ये-जा करू शकतात आणि करतातही, तसेच सरकारतर्फे खास बसेसची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जरी ग्रामपातळीवर म्हणावा इतका विकास पूर्ण झालेला नसला तरी या शिरकोली खेड्याची माहिती आता सात समुद्रापार पोहोचली आहे यात वाद नाही, आणि खेड्याचा विकास हा प्रगतीपथावर आहे हे निश्चित ..... कारण प्रत्येक भाविकाला तेथे मिळणाऱ्या उपलब्ध सुविधाच याचे प्रमाण आहे.
ReplyDeleteMast Information aahe....Sisi keep it Up ....lavkar Me Add Karto Kahi Documents
ReplyDeleteKona kade kahi Vintage Photos Astel Tar Jaroor Upload Kara...................
ReplyDelete