Friday, October 22, 2010

"न भूतो न भविष्यती".........अशी ही एक लढाई

गनिमी कावा आणि मुसलमानांचा पराभाव........
          चालुक्याचे साम्राज्य नष्ट झाल्यावर शिर्के घराण्याने एकाच वेळी घाट आणि कोकणावर राज्य केले, रायगड, विशालगड, पन्हाळा, वासोटा, भैखगड, रागणा ई. प्रसिद्ध किल्ले या घराण्याच्या ताब्यात होते. या धराण्याने सागरावरही प्रभुत्व स्थापन केलेल होते. त्यासाठी शिर्क्यानी अंदाजे 300 गलबते असलेले सामर्थ्यशाली आरमार उभे केले होते.
          इ.स. 1463 मध्ये अंदाजे 11 हजार सैन्य घेउन हामनी सुलतानाच्या मालीक उत्तजरा या क्रूर सेनापतीने शिर्के  घराण्यावर स्वारी केली. विशाळगडाच्या पायथ्याशी घनघोर युद्ध झाले. गनिमी काव्याचा चातूर्याने उपयोग करुन शिर्क्यानी 11 हजार मूसलमान सैन्यांची कत्तल केली. न भूतो न भविष्यती अशी ही लढाई झाली त्यां नंतर तब्बल 16 वर्ष मूसलमानांनी कोकणात उतरण्याची हिम्मत केली नाही. उलट " सर्वत्र अल्लाहचे राज्य आहे. शिवरायाच्चा मुलखात मांत्र सैतान राहतो" असे म्हणतात.
           या युद्धात शिर्के घराण्यातील वीरांनी जे आत्मबलिदान केले त्यांची साक्ष शिरकोलीत आहे. रायगड किल्ला हातातून गेल्यावर श्री शिर्काईचे देवालय घनदाट जंगलात नेले असण्याची शक्यता नकारता येत नाही.
        आजही देवळात श्री शिर्काईच्या मूर्तीची पूजा होत आहे. ती मुर्ती खंडीत आहे परंतु एका कुशल सोनाराने भंगलेली मूर्ती सांधून दिलेली आहे तांब्याच्या पट्ट्या अजूनही द्रष्टीमान होतात, मूर्तिभंजकानी मूर्ती वरही प्रहार केलेले आहे, हा इतिहास मूर्तीचे दर्शन होताच आठवल्याशिवाय रहात नही, ही घटना महम्मद गझनीच्या स्वारीच्या वेळी घडलेली असावी.  

5 comments:

  1. कृपया अभ्यास करून लिहावे। कुथाली हि गोष्ट वाचून तसि लिहिने योग्य नवे। तुमि लिहिलिले स्वर्व फकत एक उतारा आहे। जयाच्य पुस्तक म्हधुन तुमि लिहिले आहे त्यनीहि अभ्यास कहि नकारात फकत उतारे लिहित राहिले। तेवा ति कततल् मोर्याणि जवलिच्य खोर्यत केली होति । व त्याना मदत फकत शिर्क्य नि केली होति। फकत स्वतच मोथे पण करु नये। शेवति हे हि लकशत थेवावे कि स्वतच्य बहिनिचे कुणकु फकत थोद्यष्य वतान साथी पुसनरे हे शिरके होते। त्यानि संभाजी महाराज याना पकदुन देन्यासथि मदत केली।

    ReplyDelete
  2. सदरहू उतारा आहे तसा उतरवला आहे याची आम्ही याआधीच कल्पना दिलेली आहे....... कि आम्हाला या विषयी जास्त माहिती जाणून घेणे हेच या ब्लॉग बनविण्याचे प्रयोजन आहे.
    तरी आपण "श्री. अभिजित सुर्वे" ज्या आत्मविश्वासावर सदर प्रतिक्रिया नोंदविली आहे त्याचा तपशीलही आम्हास द्यावा कि आपणास हि माहिती कुठून प्राप्त झाली ते म्हणजे जेणेकरून आमचा अभ्यास पक्का होईल...आणि आपल्यासारखे आमचे ज्ञान आपल्याबरोबरीचे होईल...!!

    ReplyDelete
  3. निंदकाचे घर असावे शेजारी, गाढवासमोर वाचली गीता अन कालचा गोंधळ बारा होता, प्रथम मराठी नीट टायीप करा , आणि आमचा इतिहास चाच्पाण्यापेक्षा स्वताच्या घराण्याचा इतिहास तपासा.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे. ज्यांना राजेशिर्के घराण्याचं खरा इतिहास माहीतच नाहीये अशांनी राजेशिर्के घराण्याबद्दल काहीही बोलू नये.@ abhijeet surge

      Delete
  4. असुदेहो राजे........चांगल्या माणसांना समाजाकडून नेहमी अशीच वागणूक मिळते........अभिजित सुर्वे काय आणि कितपत सखोल मत मांडणी करतात याचा विचार आपण का करावा??? सुर्वे त्यांच्यापरीने विचार करतात.........शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती........!!!!!!!!!

    ReplyDelete