Monday, October 25, 2010

राजेशिर्के राजघराणे प्रथम ........ कोकणातील कुटरे या गावी आले.

कुटरे येथील राजेशिर्के यांचा थोरला वाडा -
          राजेशिर्के घराण्याने कुटरे येथे प्रथम राजवाडा बांधला. त्यानंतर ते स्वतंत्र झाले. त्यांचा मूळवाडा हाच असल्याने यास थोरला वाडा असे म्हणतात. सध्याच्या चिपळूण तालुक्यातील शिवपूर्ण काळात कोकणातील  कुटरे या गावी राजेशिर्के राजघराणे प्रथम आले. गावातील खालची पेठमधील गणेशवाडीत आजही या घराण्याची शौर्यसाक्ष मूकपणे देत आहे.
            हा चौपाखी जुना वाडा काका राजे यांचा होता. या पुरातन वाडयात सद्यस्थितीत राजेशिर्के यांचे वंशज नांदत आहेत. येथे नवसाला पावणा-या श्री देवी सुकाई देवीची पूजाअर्चा दैनंदिन होते. या राजवाडयाचे भग्नावशेष आजही शौर्यगाथा सांगण्यास तग धरून आहेत. येथे राजेशिर्के घराण्यांच्या पूर्वजांच्या पराक्रम गाजविणा-या काही साक्षीदार वस्तू वंशजांच्या संग्रही आहेत.

2 comments:

  1. अगदी बरोब्बर हे गाव आमच्या चिपळूण हून जवळच आहे .. आपण दिलेल्या ऐतिहासिक संदर्भामुळे आम्हास तिथे जाण्याची इच्छा निर्माण झाली ..

    ReplyDelete
  2. साधरण कोणत्या साला मध्ये राह्यला आले राजेशिर्के

    ReplyDelete